केंद्र सरकारने लागू केलेले चार कामगार कायदे (लेबर कोड) हे कामगारविरोधी व संविधानविरोधी असल्याचा आरोप करीत आंतरराष्ट्रीय मार्क्सवादी मानवतावादी संघटनेच्या वतीने येत्या १२ फेब्रुवारीला देशव्यापी संप पुकारला आहे. या चार कामगार कायद्यांमुळे कामगारांचे पारंपरिक आठ तासांचे कामाचे तत्त्व मोडीत काढण्यात आले. कामगारांचा संप हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. या संपात हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील कामगारांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन ललनकिशोर सिंह यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.