आज दिनांक 14 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजता जाफराबाद येथे भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची युवा सेना जाफराबाद तालुका अध्यक्ष देविदास अंबादास पाटील सवडे यांनी आमदार संतोष पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला आहे, याप्रसंगी त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी सुद्धा प्रवेश केला असून या सर्वांची आमदार संतोष पाटील दानवे यांनी पक्षात स्वागत केले आहे.