गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांनी महाराष्ट्रासह देशात कहर केलाय. शुक्रवारी पुण्यात सायबर गुन्हेगारांनी हद्द पार केली. एकाच दिवसात पुण्यात ११ वेगवेगळ्या ठिकाणी गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर गुन्हेगारांनी पुणेकरांचे दोन कोटी १६ लाख रूपयांवर डल्ला मारलाय. या प्रकारानंतर पुणे पोलीस सतर्क झाले असून तपास करण्यात येत आहे.