प्रसुतीपूर्व निदान तंत्राचा वापर करून बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करणे गर्भपात करणे शिक्षेस पात्र आहे परंतु त्यानंतरही लपून छपून गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यात येत आहे यासंदर्भात आता शासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे बेकायदेशीर गर्भलिंग निदानाची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार असून गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे समाज अजूनही भ्रूणहत्या करणाऱ्या अमानवी प्रवृत्तीची कमी नाही मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी होत आहे