वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामधील टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून गेली सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले.