हृदयविकार आणि एड्स सारखा गंभीर आजार बरा होत असल्याचे जाहिरात पत्रके वितरण करून, अनिष्ट अघोरी प्रथाचा प्रचार करून सभागृहात मोठा कार्यक्रम आयोजित केल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात कार्यक्रम आयोजक करणाऱ्या दोघांवर महाराष्ट्र नरबळी आणि अनिष्ट,अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. जगतारसिंग धर्मसिंग चव्हाण आणि रमेश संपत वावरे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहे.