भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, देऊळगाव माळी येथे अत्यंत श्रद्धाभावाने व उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून बाबासाहेबांनी दिलेल्या ज्ञान, समता, बंधुता व शिक्षण या तत्वांचे स्मरण करीत सामाजिक परिवर्तनाचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य वसंत किसन डोंगरे सर यांनी भूषविले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी “महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी नाचून नव्हे तर वाचून साजरी करा” असे प्रभावी आवाहन त्यांनी केले.