फिर्यादी रामभाऊ एकनाथ भोकरे यांच्या तक्रारीनुसार पांढरी येथील आरोपी सतीश तायडे हा हेडंबा मशीन मालकासोबत वाद करत होता. त्यावेळी फिर्यादीने वाद का करत आहे असे आरोपीस म्हटले असता आरोपीने दगडाने फिर्यादीच्या कपाळाला मारून तसेच काठीने मारहाण करून जखमी केले व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी नेर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.