आज दि ६ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रति पंढरपूर येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शहर व परिसरातून हजारो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दिंडीमध्ये सहभागी होत भक्तिभावाने निघाले. ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात, “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या जयघोषात भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी यात्रा सुरू केली.भाविकांनी आपल्या संपूर्ण परिवारासह या यात्रेत सहभाग घेतला. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिभाव दिसून येत होता.