हिंगणा मतदारसंघातील बोरखेडी (रेल्वे) येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' कार्यक्रम आज पार पडला. यावेळी तीन पिढ्यापासून वडार, सरोदी, पारधी, गोसाई अशा भटक्या समाजाना न मिळालेले जातींचे प्रमाणपत्र आज लोकांना वाटप करण्यात आले. त्यामुळे या सर्व समाज बांधवांनी समाधान व्यक्त केले. तसेच याठिकाणी महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरीकांना देण्यात आली.