कन्नडमध्ये एमआयडीसी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दि एक डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता सभेतूनच पुढाकार घेतला.भाषणादरम्यान त्यांनी तात्काळ उद्योगमंत्री यांना फोन करून एमआयडीसीची मंजूरी व कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना दिल्या.“कन्नडच्या युवकांना रोजगार आणि भागाला औद्योगिक ओळख देणे हा हेतू आहे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.या घोषणेमुळे कन्नड तालुक्यात आनंदाची लाट असून नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.