पुसद: नवजीवन कॉलनी परिसरात हरवलेली दोन वर्षीय त्रिशा अखेर सुखरूप; पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक
पुसद शहरातील नवजीवन कॉलनी परिसरात दोन वर्षांची त्रिशा अजय पांढरे ही लहान मुलगी रडत भटकताना आढळून आली. तात्काळ नागरिकांच्या खबरदारीतून ही माहिती पुसद शहर पोलीसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ परिसरात पीए सिस्टीमद्वारे घोषणा करत पालकांचा शोध सुरू केला. काही वेळाच्या शोधानंतर मुलीची आई सौ. वैशाली पांढरे, रा. नवीन पुसद यांचा शोध लागला आणि त्रिशाला सुरक्षितरीत्या त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.