धुळे: धुळे संतोषी माता चौकात 'सिटू'चे सातवे अधिवेशन उत्साहात संपन्न; कामगारांना राज्यध्यक्षांचे अनमोल मार्गदर्शन
Dhule, Dhule | Nov 30, 2025 सिटूच्या धुळे-नंदुरबार जिल्हा शाखेचे सातवे अधिवेशन धुळेतील संतोषी माता चौकातील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात उत्साहात पार पडले. राज्याध्यक्ष कॉ. डी. एल. कराड आणि ज्येष्ठ नेते कॉ. सिताराम ढोबरे यांनी कामगार चळवळ, न्याय्य हक्कांचा लढा आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केले. धुळे-नंदुरबारमधून मोठ्या संख्येने कामगार आणि पदाधिकारी उपस्थित राहिल्याने अधिवेशनाला भव्य स्वरूप लाभले.