पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील दत्तनगर गुजरवाडी रोड वर एका तरुणाने दारूच्या नशेत धिंगाणा घातला. ही सगळी घटना १० डिसेंबर रोजी रात्री घडली असून सी सी टिव्ही मध्ये कैद झाली आहे. या तरुणाने एका किराणा दुकानात जात सिगरेट ची मागणी केली पण दुकानात सिगरेट आमच्याकडे मिळत नाही असं दुकानदाराने सांगताच त्या तरुणाने नशेत दुकानाचे नुकसान करायला सुरुवात केली