पुणे शहरात दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला समर्थ पोलिसांनी अटक करत कारवाई केली आहे. मंगळवार पेठ परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी दोन आरोपी आणि एका विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल ८ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.