एका भरधाव टेम्पोने चिरडल्याने शेतातून घरी येणारा एक दुचाकीस्वार तरुण ठार झाला. ही घटना मंगळवारी (दि.२०) सायंकाळी वाजेच्या सुमारास ४ पैठण तालुक्यातील अब्दुल्लापूर तांडा शिवारात घडली. विशाल गणेश राठोड (वय २५) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल्लापूर तांडा येथील अविवाहित तरुण विशाल राठोड हा मंगळवारी सायंकाळी स्वतःच्या शेतातून दुचाकी (एमएच. २०, एचएल. ३२५०) ने घरी येत होता. यावेळी आडूळकडून-बालानगरकडे वेगाने भरधाव जाणाऱ्या टेम्पो (एमएच. २०, ईजी. ९३८३) ने त्याच्या दुचा