कळमेश्वर: ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे शिवसेना उबाठागटाचे मंगेश गमे यांनी दिला आंदोलनाचा इशारा
ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे शासकीय 102 आपत्कालीन सेवेसाठीची ॲम्बुलन्स ही रुग्णांच्या जीवावर बेफिक्रे करणाऱ्या निर्णयामुळे फक्त दिवसा आठ ते रात्री 8 अशा वेळेत चालू ठेवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे रात्रीची सेवा पेमेंट पूर्ण नाही म्हणून थांबवली जात असल्याचे जाहीर नोटीस व स्पष्ट लिहिले आहे यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यावरून तीव्र निषेध केला आणि ही सेवा तात्काळ सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे