डिगडोह नगरपरिषदेअंतर्गत येणाऱ्या पोलीसनगरात पोलीस गृह समस्यानिवारण संस्थेने चक्क सार्वजनिक खुल्या जागेवर प्लॉट पाडून त्याची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या जागेवरील अवैध बांधकाम तत्काळ पाडून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नगरसेवक सुरेश काळबांडे व रहिवाशांनी पत्रपरिषदेत केली आहे.संस्थेने स्वतःच्या फायद्यासाठी मूळ नकाशात चार वेळा बेकायदेशीर बदल केले. सर्व्हिस रोड आणि खुल्या जागेवर खोटा प्लॉट क्र. २०६ (जी) दर्शवून तो विकण्यात आला.