सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे शेतात न्याहारी करत असताना बिबट्याने शेतमजूर गोरख लक्ष्मण जाधव यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने मानेवर झडप घातल्याने दोघेही ४० फूट खोल विहिरीत कोसळले. गोरख यांना वाचवता आले नाही. वनविभागाने बिबट्याला पकडले, मात्र तो पाण्यात बुडून मरण पावला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.