शासनाला चेहरा नसतो मात्र ते चालविणारे संवेदनशील अधिकारी असले तर त्याचा लाभ सामान्य नागरिकांसाठी होतो याचा परिचय देवरीच्या उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांनी अपघातात गंभीर असलेल्या जखमींना आपल्या शासकीय वाहनातून रुग्णालयात पोहोचवून दिला गुरुवारी सालेकसा येथे बैठक आटोपून सायंकाळी जवळपास पाच ते सहा वाजताच्या दरम्यान उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड या देवरीकडे जात होत्या याचवेळी हरदोली गावाजवळ रस्त्याच्या कडेला एका अपघातात दोन व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसून आले परिस्थितीचे गांभ