मातेसमान असलेल्या उषाताई तनपुरे यांच्या प्रतिमेला काळे फासण्याचा झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. त्या प्रकाराचा आम्ही निषेध व्यक्त करतो. अशी प्रतिक्रिया राहुरी शहराचे भाजप नेते प्रफुल्ल शेळके यांनी दिली आहे. आज शनिवारी दुपारी माध्यमांशी बोलताना शेळके म्हटले की,सदर प्रकार विरोधकांनी केला अशी टीका केली गेली. मात्र विरोधक अशी कृत्य करू शकत नाहीत याची सहानुभूती कोणाला होईल याचा मतदारांनी बोध घ्यावा. विकास कामांवर बोलणे ऐवजी सहानुभूतीवर राजकारण होत असल्याचा आरोप देखील शेळके यांनी केला.