महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज जनहिताशी संबंधित महत्वाच्या विषयांवर चर्चा करताना मा. आ. श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेत आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी सहभागी होत राज्यातील भटक्या जमाती व विमुक्त जाती प्रवर्गातील पात्र नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी राबविण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींबाबत आमदार महाले यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.