धानोली-गुमगाव परिसरातील शेतशिवारात शेतमजुराचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृतक शेतमजुराचे नाव नीतेश रमेश बोधनकर (३५), असे आहे. तो मूळ पिंपळगाव, ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती येथील रहिवासी आहे. तो वाघदरा गुमगाव परिसरात वास्तव्याला होता. मृतक हा तुळशीदास थोटे यांच्या शेतशिवारात ट्रॅक्टरचालक म्हणून काम करायचा. दहा दिवसांपूर्वी तो लग्नासाठी आपल्या गावी गेला होता. त्यानंतर तो कधी परत आला, याची माहिती शेतमालकाला नव्हती. नीतेशला दारूचे व्यसन असल्याची बाब समोर आली.