समुद्रपूर: मोहगांव येथे भागवत सप्ताहाच्या औचित्यावर गावात काढण्यात आली रामधुन शोभायात्रा: करण्यात आला विठ्ठल नामाचा गजर
समुद्रपुर तालुक्यातील मोहगांव येथे आज २२ एप्रिलला सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास भागवत सप्ताहाच्या औचित्यावर हरीभक्त पारायण रुपेश महाराज तळवेकर यांच्या मार्गदर्शनात रामधून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी या शोभायात्रेत गावातील भजन मंडळींने सहभागी होत विठ्ठल नामाचा गजर केला यावेळी संपूर्ण गाव भक्तीमय वातावरणात तल्लीन झाले होते.या रामधुन शोभायाचे समारोप गावातील हनुमान मंदीरात करण्यात आला.