सिन्नर शहरातील नाशिक-पुणे महामार्गावर जिंदाल फाटा येथे या कामगाराला भरधाव डंपरने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. डंपरखाली सापडल्याने त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून डॉक्टरांनी पाय तुटल्याचे सांगितले. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला, तर जखमीला स्थानिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात हलविले.