अर्जुनी मोरगाव: मानवता विद्यालय बोंडगावदेवी येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये अथर्व कापगते द्वितीय
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन मानवता विद्यालय बोंडगाव देवी येथे करण्यात आले होते. ही विज्ञान प्रदर्शनी प्राथमिक व माध्यमिक अश्या दोन गटांमध्ये घेण्यात आले होते. तालुक्यातील सर्व शाळांनी या प्रदर्षणीमध्ये सहभाग घेतला होता. यात सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंट येथील अथर्व अजय कापगते याने जल संवर्धन आणि व्यवस्थापन या मुख्य विषयासह इको हायड्रा यावर आपला प्रयोग सदर केला होता. यात त्याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.