यवतमाळ: शहरातील स्टेट बँक चौकात वाळलेल्या फांद्यानी घेतला पेट
यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौक परिसरातील साई हॉस्पिटल जवळ झाडाच्या तोडलेल्या फांद्याच्या ढीग पडून होता त्याला अचानकपणे आग लागल्याची घटना उघडकीस आली. काही मिनिटातच आगीने प्रचंड रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांची एक तारांबळ उडाली.अग्निशमन बंब येण्यापूर्वीच धाडसी नागरिकांनी मोटर पंपाने पाणी टाकून आग नियंत्रणामध्ये आणली.