परदेशात पळून गेलेल्या गँगस्टर निलेश घायवळ याला न्यायालयाने फरार घोषित केले आहे. त्याचवेळी निलेश घायवळ याच्याविरुद्धच्या खटल्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ शिशीर हिरे यांची नियुक्ती करावी असा प्रस्ताव पोलिसांनी राज्य शासनाकडे पाठविला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.