दि. 10 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 1 वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील शिरपूर भुयारी मार्गाजवळ सिमेंट काँक्रीट वाहन पलटी होऊन चालक गाडीखाली दबला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ गमे व त्यांच्या टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व पोलिस प्रशासनाला सहकार्य केले.