जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, अर्जुनी/मोरगाव येथे वार्षिक स्नेह संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.शाळेच्या पातळीवर अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळते,तसेच टीमवर्क,नेतृत्वगुण आणि सामाजिक भान विकसित करण्यास मदत होते.असे याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर म्हणाले.