कोपरगाव मतदारसंघातील अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे यासाठी आज 3 डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. आ.आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.कोपरगाव मतदारसंघात मागील काही दिवसांपासून खुलेआम जुगार, मटका अड्डे, अवैध दारु विक्री, तंबाखू - गुटखा विक्री, ऑनलाईन बेटिंग, वाळूचोरी आदी अवैध धंदे बिनदिक्कत सुरु आहेत. वाम मार्गाला लागत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरीही पोलीस प्रशासनाचे सदर गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असुन कोणत्याही प्रकारची कार्यवाही नाही.