\पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुंडा विरोधी पथकाने चिखली, वाकड व आळंदी पोलीस स्टेशन हद्दीत ११ डिसेंबर २०२५ रोजी केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवायांत मोठे यश मिळवले आहे. या संयुक्त कारवायांमध्ये एकूण पाच सराईत गुन्हेगारांकडून तब्बल सात देशी बनावटीची पिस्टल व सहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत.