२५ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. उमेश जगदेव अंभोरे (वय २५) असा मृत्यू झालेल्या तरुणाचा नाव असून, तो शुक्रवारी सकाळी अंदाजे ९ वाजता स्थानिक देशी दारू दुकानाच्या मागील बाजूस मृत अवस्थेत आढळून आला. ही घटना समजताच त्यांचे वडील जगदेव कुंडलिक अंभोरे यांनी दुपारी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. युवकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.