मुरबाड: मुरबाड येथील शरद पवार गटाचे नेते सुभाष पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश
Murbad, Thane | Nov 13, 2025 आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास मुरबाड येथील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केलं आहे. यावेळी प्रामुख्याने आमदार किसन कथोरे यांच्या विरुद्ध निवडणुकीत 1,23,117 मते घेतलेले शरद पवार गटाचे नेते सुभाष पवार यांनी देखील भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.