सरदवाडी रोडवरील महालक्ष्मीनगरात राहणाऱ्या प्रेमचंद पवार यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी पळवून नेली. पवार यांनी त्यांची शाईन दुचाकी क्र. एम. एच. १५/ई. डब्ल्यू, ९५६१ ही घरासमोर उभी केली होती. चोरट्याने साधत तेथून दुचाकी पळवून नेली. पवार यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.