आज दिनांक 13 जानेवारी 2026 वार मंगळवार रोजी रात्री 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरातून वाहणाऱ्या पूर्णा नदी पात्रामध्ये दिनांक 11 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भोकरदन चे उपविभागीय अधिकारी जीश्रवण यांच्या पथकाने नदीपात्रातून चोरट्या मार्गाने व अवैध वाळू वाहतूक करणारा विना नंबरचा हायवा जप्त केला आहे,व त्याच्यावर जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत वाहन जप्त केले,असून या कारवाईमुळे अवैध वाढू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.