लग्न जुळवण्यासाठी दोन लाख 90 हजार रुपये घेऊन लग्न झाल्यानंतर सासरी जाताना नवरी जेवण करण्यासाठी गाडी थांबताच फरार झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पाच डिसेंबरला दुपारी बारा वाजता माहिती दिली.