गोंडपिपरीतालुक्यातील आक्सापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सरकारी जमिनीतून जवळपास ३० ब्रासपेक्षा कमी मुरुमाची चोरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आला असून, या प्रकरणाने गावासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही चोरी साधारण २५ ते ३० दिवसांपूर्वी झाल्याचे समजते. परंतु याची कोणतीही नोंद महसूल अथवा ग्रामपंचायतीकडे नाही.