पुण्यातील नवले पुलावर सतत होणाऱ्या दुर्घटनांबाबत शिवसेना नेते वसंत मोरे फेसबूक लाईव्ह करत होते. नवले पुलावरील अपघात रोखण्याबाबत उपाययोजना काय करता येतील या विषयावर ते फेसबुक लाईव्ह करत होते. त्याच दरम्यान एक वाहन त्यांच्या विरुद्ध दिशेने येत होते. ते वाहन थेट वसंत मोरे उभे असलेल्या दिशेने भरधाव वेगाने आलं. पण वेळची मोरे यांचा कॅमेरामन आणि स्वत: वसंत मोरे रस्त्याच्या बाजुला धावल्यानं ते बचावले.