सिक्कीम मधील कंपनीचे बनावट औषध तयार करुन वितरीत करणाऱ्यांसह पुण्यातील औषध विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील औषध विक्रेत्यांसह ८ जणांवर गुन्हे दाखल करुन, पुण्यातील मेडिकल दुकानातून २ लाख ७५ हजार रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहेत. याप्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे