वाशिम: जनजागरण मंचच्यावतीने आयोजित रोखठोक या कार्यक्रमाने शहरातील नागरिकांना नगराध्यक्ष ची निवड करण्यात होणार सुलभता
Washim, Washim | Nov 28, 2025 वाशिम येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनतेतून नगराध्यक्ष ची निवड होणार आहे या अनुषंगाने वाशिम शहरातील जनजागरण मंचच्या वतीने रोखठोक हा कार्यक्रम शहरातील वाटाणे मंगल कार्यालयात ठेवण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना वाशीमच्या विकासाचे व्हिजन ब्ल्यू प्रिंट याविषयी विविध प्रश्न विचारून त्यांच्याकडून उत्तर घेण्यात आले . ज्यामुळे नागरिकांना दिनांक 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या वेळी नगराध्यक्ष पदाचा आपला योग्य उमेदवार निवडण्यात मदत होईल.