समुद्रपूर: तहसीलदारांच्या तत्परतेने अनेक वर्षांपासून प्रलंबित वडगाव पाईकमारी पांदन रस्त्याची वाट मोकळी:तात्काळ अतिक्रमण खुले
वडगाव पाईकमारी पांदन रस्ता दोन्ही गावातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात दिवसात शेतात जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता.अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या प्रतिक्षेत शेतकरी होते. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आमदार समिर कुणावार यांनी या पांदन रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिली.मात्र रस्त्याच्या कामाची सुरुवात होताच याठिकाणी अतिक्रमणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.तहसीलदार कपिल हाटकर यांनी दखल घेऊन तात्काळ रस्ता खुला करून दिला