नेवासा नगरपंचायतीच्या रणधुमाळीत भाजप-सेना युती सत्ता मिळवण्याच्या पूर्ण तयारीत आहे.या निवडणुकीचे खरे किंगमेकर नेवासेकरच ठरणार आहेत,असे ठाम प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्रभाकरराव शिंदे यांनी केले.जनतेतून नगराध्यक्ष निवडल्या जाणाऱ्या निवडणुकीत युतीने डॉ.करणसिंह घुले यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी जाहीर केली आहे.त्यांच्या प्रचार फेरीतील कॉर्नर सभेत शिंदे बोलत होते.