पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आजपासून पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात होतेय. या ठिकाणी वाचक आणि पुस्तक प्रेमींना तब्बल ८०० बुक स्टॉल ला भेट देता येणार आहे आणि विशेष म्हणजे तब्बल ५० लाख पुस्तकं याठिकाणी पाहता आणि वाचता येणार आहेत. मराठी, हिंदू, इंग्रजी, तमिळ, तेलगू या सारख्या विविध भाषांमधील पुस्तकं याठिकाणी पुस्तक प्रेमींना पाहायला मिळणार आहेत