समृद्धी महामार्गावर आयशर चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना नुकतीच घडली. राहुल लाला खरात रा. जालना हे आपल्या आयशरमध्ये मुंबईहून स्क्रैप भरुन समृद्धीने जालन्याकडे जात होते. सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयशर बंद पडल्याने ते खाली उतरुन बघत असताना स्कॉर्पिओमधून आलेल्या दोघांनी राहल यांना धरुन त्यांच्या खिशातील ११ हजारांची रोकड व आयशरमधील १२० लिटर डिझेल चोरुन तेथून पळ काढला. याप्रकरणी राहुल यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे