शेतातील मक्याचे कणीस आणि कांदे चोरताना पाहिल्यामुळे सुरू झालेला किरकोळ वाद चक्क गंभीर हाणामारीत बदलला. पतीला लोटून मारहाण, विवाहितेची छेडछाड आणि दगडाने प्राणघातक हल्ला अशा धक्कादायक प्रकाराने मेरा खुर्द परिसर दणाणून गेला. अंढेरा पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. अंढेरा पोलिस स्टेशनमध्ये दाखल फिर्यादी सतीश मधुकर वाघमारे (वय ३४, रा. मेरा खुर्द) यांच्या तक्रारीत वर्णन केले आहे की, ते व पत्नी शेतात असताना काही आरोपी मक्याचे कणीस व कांदे घे kkऊन जात असल्याचे त्यांनी पाहिले. याबाबत कारण विचारताच आरोपी संतापून फिर्यादीला लोटपोट करत मारहाण करू लागले. पत्नीने हस्तक्षेप केल्यावर तिच्या अंगावरही धावून जाऊन छेडछाड केली