बंडगार्डन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न (भा.दं.वि. कलम ३०७) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करून मोठी कामगिरी केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव तम्मा उर्फ रोहित सुरेश धोत्रे (रा. वडारवाडी, चतुर्शिंगी, पुणे) असे आहे.