अहिल्या नगर जिल्ह्यात गोरक्षकांवर हल्ल्यांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशाच सुडाच्या भावनेतून राहुरी तालुक्यातील मानद प्राणी कल्याण पधाधिकारी डाॅ. आप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडी (वय ३९, रा. तांदुळनेर) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी आज शनिवारी सकाळी नाईकवाडे यांनी राहुरी पोलीस ठाणे गाठत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.