समुद्रपूर: गिरड खुर्सापार रस्त्यावर रोज व्यार्घ दर्शन:शेतकरी व शेतमजूरांनामध्ये भीतीचे वातावरण
समुद्रपुर तालुक्यातील गिरड परीसरात वर्षभऱ्यापासुन वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला असुन या वाघांनी आतापर्यंत अनेक जनावरांना यमदानी पाठवले आहे.यामुळे परीसरातील शेतकरी व शेतमजूरांमध्ये वाघाच्या प्रती दहशत निर्माण झाली आहे.गिरड खुर्सापार रस्त्यावर व शिवारात रोज दिवसा रात्री व्यार्घ दर्शन होत आहे.रविवारी रात्री गिरड वरून चारचाकी वाहनाने जाणाऱ्या नागरीकांना व्यार्घ दर्शन घडले असुन त्यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून या वाघाच्या हालचाली कैद केल्या आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी