आष्टी: तालुक्यातील रुई नालकोल परिसरात अपघातात
Ashti, Beed | Nov 28, 2025 आष्टी तालुक्यातील रुई नालकोल परिसरात आज शुक्रवार दि 28 नोव्हेंबर रोजी 5:30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू झाला.हरिदास बापूराव औटे (वय ६०, रा. नांदा, ता. आष्टी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.ऊस भरण्यासाठी जात असलेल्या ट्रॅक्टरच्या मागील डबल ट्रॉलीच्या चाकाखाली ते सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातस्थळी सपोनि नरुटे, पोहेकॉ नंदकिशोर सवासे, अंमलदार प्रभाकर खोले यांनी भेट देऊन पंचनामा केला.